"गर्वाने म्हणा मी ** आहे "..............
"मला माज आहे मी मराठी असण्याचा ."....
ही आणि अशी वाक्ये आजकाल कितीतरी भित्तींवर (=भिंती /walls ) वारंवार पाहायला मिळते.कधी कधी तर, वाचून पाठ आणि गुळगुळीत झालेली ही घोष वाक्ये कोण कुठून आणून अशी पानांवर ठेवते ते पहावे असे वाटते. असो मुलांनो,नकलून चिकटवणे (copy -paste ) हे केवळ एक सोपे तंत्र आहे .
पण असे आयते उचलून खपवण्यापेक्षा आपल्या शब्दात आपले विचार लिहिले तर...
ह्यासाठी आधी खूप वाचा.उत्तमोत्तम लेख , साहित्य वाचा. मग आपोआप स्वत:ची छान छान वाक्ये तुम्ही स्वत:च लिहू शकाल...!
गर्वाने गर्जना करून काय होणार? त्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करू,कष्ट करू .आणि असे सक्षम,सबळ होऊ या की -
*-नव्या युगाचे आम्ही नवे मनु |,उचलू आव्हानाचे धनु ......
*-नव्या युगाचे आम्ही नवे मनु |
उचलू आव्हानाचे शिव-धनू ||
तमा कष्टांची न मानू |
विश्व नभामधी जणू तळपत राणू - - -
साऱ्या जगात आपण भारतीय आज चमकत आहोत. ह्याहून अधिक तेजाने तळपत राहू.
२)- "गर्व से कहो हम ...."
ही घोषणा हिंदीत योग्य आहे.मराठीत 'गर्व ' म्हणजे अहंकार.,जो कधी असू नये.गर्वाचे घर खाली...माहित आहे ना? (काही लोक तर यावर कडी करतात - "माज आहे " म्हणे...
अरेरे !! काय ही भाषा.....
गर्जेल तो करील काय ?
आजवर आपण न बोलता प्रगती करत गेलो.आताही करू या.
फारतर , मराठीत म्हणा.. " अभिमान आहे " - मात्र गर्व नव्हे.!
पण ते काहीही म्हणूच नका ना .करूनच दाखवू या.चला तर मग, लागा मुलांनो कामाला.....
facebook