Monday, 12 March 2018

* "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "

       


#संस्कृतमालिका

वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं |
‎*आज सर्वपितृ अमावास्या.मृत आई-वडील,पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे.स्मृतीप्रीत्यर्थ गरजूंना दान /मदत व्हावी असा   उद्देश ठरवून इतर कर्मकांडे करावीत . काहीजण ते करतातच .
का
ळ   बदलला. पूर्वी ब्राह्मण विपन्नावस्थेत राहून समाजाला शिक्षित ,सुसंस्कारित करत. त्याची फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात ,समाज कृतद्न्यता म्हणून दान देत असे.ते योग्यही होते. कालमानपरत्त्वे थोडासा बदल करून  आपण वंचित,  आणि खऱ्याखुऱ्या गरजूंना सत्पात्री सहाय्य केल्यास आपल्यालाही समाधान मिळेल .
(काही 
सुधारक लोक तर ह्यापैकी काहीच करत नाहीत. ही मोठीच सुधारणा आणि बदल...!!)
:D


* कालमानपरत्त्वे रुढी ,परंपरा आणि कर्मकांडामध्ये बदल होवू शकतो. आपण करू शकतो. आपल्या मातापिता  आणि पूर्वजांविषयीच्या श्रद्धायुक्त भावना  आणि श्रद्धांजली म्हणून हवे तर विधीही करावे , ते न जमल्यास निदान दान करावे... असे तुम्हालाही वाटते ना ?
मुस्लीम बांधव समाजासाठी आपल्या  उत्पन्नातील  काही भाग जकात म्हणून  देतात (हाच पैसा गरीबाना  मिळतो म्हणतात.) आपणही पूर्वीप्रमाणे सुयोग्य सत्पात्री दान का करू नये ?
*
 "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "
असे आमचे आजोबा , आपल्या  कुटुंबियांना  सांगत . सामाजिक  भान  असावे  ह्या  अर्थाने  हा श्लोक म्हणत. म्हणजे ,~
शेतात वाळ
त चालेल्या पिकाना संजीवनी देणारा पाऊस शेतीऐवजी सागरात पाऊस पडून काय उपयोग ,आणि   जेवून संतुष्ट असलेल्यास जेवू घालून काय उपयोग ? पाऊस  पडूनही  पिकांच्या  दृष्टीने वाया  जाणार . आणि  भुकेजल्याच्या  दृष्टीने  पाहिल्यास ते अन्नदान   वाया  जाणार . 
आम्ही श्राद्ध-पक्ष,  अन् ह्या  सोबतच तारखेने स्मृतीदिन / वर्धापनदिन , कुटुंबीयांचा वाढदिवस ,दसरा ~ दिवाळी  हे सण    ( कधी कधी पंधरा  ऑगस्ट  , सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय संण ) या निमित्त (जिथे खरेच उत्तम कार्य , शासन मदतीशिवायहि  चालते , तेथे ...) वृद्धाश्रम ,अनाथाश्रमास सस्नेह 'भेट'  देतो. 
यथाशक्ती  काहीतरी  देतो. ते दान  नाही  तर ,  प्रेमाची  एक भेट असते.