#संस्कृतमालिका
वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं |
*आज सर्वपितृ अमावास्या.मृत आई-वडील,पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे.स्मृतीप्रीत्यर्थ गरजूंना दान /मदत व्हावी असा उद्देश ठरवून इतर कर्मकांडे करावीत . काहीजण ते करतातच .
काळ बदलला. पूर्वी ब्राह्मण विपन्नावस्थेत राहून समाजाला शिक्षित ,सुसंस्कारित करत. त्याची फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात ,समाज कृतद्न्यता म्हणून दान देत असे.ते योग्यही होते. कालमानपरत्त्वे थोडासा बदल करून आपण वंचित, आणि खऱ्याखुऱ्या गरजूंना सत्पात्री सहाय्य केल्यास आपल्यालाही समाधान मिळेल .
(काही सुधारक लोक तर ह्यापैकी काहीच करत नाहीत. ही मोठीच सुधारणा आणि बदल...!!)
:D
* कालमानपरत्त्वे रुढी ,परंपरा आणि कर्मकांडामध्ये बदल होवू शकतो. आपण करू शकतो. आपल्या मातापिता आणि पूर्वजांविषयीच्या श्रद्धायुक्त भावना आणि श्रद्धांजली म्हणून हवे तर विधीही करावे , ते न जमल्यास निदान दान करावे... असे तुम्हालाही वाटते ना ?
मुस्लीम बांधव समाजासाठी आपल्या उत्पन्नातील काही भाग जकात म्हणून देतात (हाच पैसा गरीबाना मिळतो म्हणतात.) आपणही पूर्वीप्रमाणे सुयोग्य सत्पात्री दान का करू नये ? *
"वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "असे आमचे आजोबा , आपल्या कुटुंबियांना सांगत . सामाजिक भान असावे ह्या अर्थाने हा श्लोक म्हणत. म्हणजे ,~
शेतात वाळत चाललेल्या पिकाना संजीवनी देणारा पाऊस शेतीऐवजी सागरात पाऊस पडून काय उपयोग ,आणि जेवून संतुष्ट असलेल्यासच जेवू घालून काय उपयोग ? पाऊस पडूनही पिकांच्या दृष्टीने वाया जाणार . आणि भुकेजल्याच्या दृष्टीने पाहिल्यास ते अन्नदान वाया जाणार .
आम्ही श्राद्ध-पक्ष, अन् ह्या सोबतच तारखेने स्मृतीदिन / वर्धापनदिन , कुटुंबीयांचा वाढदिवस ,दसरा ~ दिवाळी हे सण ( कधी कधी पंधरा ऑगस्ट , सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय संण ) या निमित्त (जिथे खरेच उत्तम कार्य , शासन मदतीशिवायहि चालते , तेथे ...) वृद्धाश्रम ,अनाथाश्रमास सस्नेह 'भेट' देतो.
यथाशक्ती काहीतरी देतो. ते दान नाही तर , प्रेमाची एक भेट असते.
#संस्कृतमालिका
वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं |काळ बदलला. पूर्वी ब्राह्मण विपन्नावस्थेत राहून समाजाला शिक्षित ,सुसंस्कारित करत. त्याची फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात ,समाज कृतद्न्यता म्हणून दान देत असे.ते योग्यही होते. कालमानपरत्त्वे थोडासा बदल करून आपण वंचित, आणि खऱ्याखुऱ्या गरजूंना सत्पात्री सहाय्य केल्यास आपल्यालाही समाधान मिळेल .