Wednesday, 12 October 2011
Tuesday, 11 October 2011
#-(१)-#
-वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥ ..=वनांना (वनानि=अनेक वने ) जळताना अग्नी=वन्हीला ,मारुत =वारा हा सखा होतो(सखा होऊन साह्य करतो.वार्यामुळे वणवा भडकतो.).तोच (स एव)वारा दिव्याचा नाश करतो(विझवतो).कृश=अशक्त/दुबळ्या चे कसले मित्रत्त्व ? (समर्थ असल्यास मित्र मदत करतात.वाईट कामातही सहाय्य देतात.. पण दुर्बलाला मात्र मित्र नसतात,असले तरी शत्रू होऊन चांगल्य...ा कामात विघ्ने आणतात. असा काहीसा अर्थ ......... ****अजा पुत्रं बलिंम दद्यात ,देवो दुर्बल घातक:| अशाच अर्थाचे वचन आहे. आता सांगाल या वाचनाचा अर्थ? अजा=शेळी ... मित्रांनो,आता जमेल.बघा.)
*(२)*
शतॆषु जायतॆ शूरः| सहस्रॆषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु|
दाता भवति वा न वा ॥
शंभरात एक शूर होतो (व्यक्तीत)शत=शंभर.जायते=होतो/ह ोते.)
हजारात एक विद्वान , पन्डीत होतो. वक्ता,उत्तम भाषण करणारा दहा हजारात एक होतो.तर दानी मात्र होतो किंवा होतच नाही.( खरा उदार,दाता कुठेच आढळत नाही.(आचार्य अत्रेन्बद्दल वक्ता दश- सहस्त्रेषु -असे म्हणत असत.नि तेही प्रत्येक गोष्ट ठसवण्यासाठी " दहा हज्जार वर्षात असे ---झाले नाही " असे म्हणत असत.
-वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥ ..=वनांना (वनानि=अनेक वने ) जळताना अग्नी=वन्हीला ,मारुत =वारा हा सखा होतो(सखा होऊन साह्य करतो.वार्यामुळे वणवा भडकतो.).तोच (स एव)वारा दिव्याचा नाश करतो(विझवतो).कृश=अशक्त/दुबळ्या
*(२)*
शतॆषु जायतॆ शूरः| सहस्रॆषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु|
दाता भवति वा न वा ॥
शंभरात एक शूर होतो (व्यक्तीत)शत=शंभर.जायते=होतो/ह
हजारात एक विद्वान , पन्डीत होतो. वक्ता,उत्तम भाषण करणारा दहा हजारात एक होतो.तर दानी मात्र होतो किंवा होतच नाही.( खरा उदार,दाता कुठेच आढळत नाही.(आचार्य अत्रेन्बद्दल वक्ता दश- सहस्त्रेषु -असे म्हणत असत.नि तेही प्रत्येक गोष्ट ठसवण्यासाठी " दहा हज्जार वर्षात असे ---झाले नाही " असे म्हणत असत.
व्याकरणानुसार अनुक्रमाने विभक्ती
राम या शब्दाला , व्याकरणानुसार अनुक्रमाने विभक्ती या श्लोकात कशा आहेत ते पाहू या.मराठी,संस्कृतात त्या सात असतात. .१ ) - प्रथमा= राम:.(राम आला) =राम:/रामो राजमणी सदा विजयते.=राम सतत विजयी होतो. -२ )- द्वितिया= रामं (रामा ला भजतो ) raamam रमेशं भजे=मी रामाला भजतो/भक्ति करतो. - ३ )तृतीया =रामेणा (रामा ने ) रामाने निशाचर राक्षसान्चा नाश केला - 4 )- चतुर्थी =रामाय (रामा ला )रामाला नमस्कार असो/करतो/करते.. - ५ ) पञ्चमी =रामात (रामा ने/ हून/पेक्षा) रामाहून कोणी श्रेष्ठ नाही . .. - ६ ) षष्ठी =रामस्य (रामाचे/ची/च्या/चा ) रामाचा दास आहे.-मी .......... - ७ )सप्तमी =रामे (रामा त /मध्ये/ )रामात माझे चित्त लागू दे. ....... - ८ )संबोधनं = नाव (बोलावणे./संबोधित करणे/हाक देणे )हे /भो/अहो राम ,मल तार,उद्दर,उद्धार कर.
राम झाड पान लक्ष्मण हवा घातली..?..................
राम झाड पान लक्ष्मण हवा घातली....?
संस्कृत खूप कठीण आहे,समजत नाही असे बरेच जण बरेचदा म्हणतात. हा बघा ,आपल्या कानावर नेहमी पडणारा ,अखिल हिंदू वर्गास पाठ असणारा श्लोक.समजण्यास कित्ती सोप्पा आहे. यातील राम हि अक्षरे असलेला प्रत्येक शब्द घ्या .मराठी व्याकरणातील विभक्ती प्रत्यय... आठवतात का?नाही?बरे,हरकत नाही. हे बघा काही शब्द येथे आहेत .मी म्हणते हे अर्थपूर्ण वाक्य आहे.तर ते तुम्हाला मान्य होईल का ?बघा हं- राम झाड पान लक्ष्मण हवा घातली.... समजले नाही ना?समजले वाटले असेल तरी खात्रीपूर्वक छातीठोकपणे अचूक अर्थ सांगता येईल?बहुधा उत्तर" नाही "असेच येईल .का बरे ?अहो एहाही शब्दाला पुढे अप्र्क्षित असलेला विभक्ती प्रत्यय जोडलाच नाही मी वेडीने.आता जोडते.बघा हं.- रामा-ने झाडा-चे पाना-ने लक्ष्मणा-ला हवा घातली.येथे ने,चेहे ते प्रत्यय आहेत.यावाचून भाषा शून्य/अधुरी hoil .हो ना? हेच या श्लोकात अगदी व्याकरणातील शास्त्रशुद्ध क्रमाने दिले आहे.फक्त ते एकवचनी नामासाठी आहेत.पान सुरुवातीस एवढे पुरेसे आहे.
रामो राजमणिः सदा विजयते | रामं रमेशं भजे |
रामेणाभिहता निशाचरचमू | रामाय तस्मै नमः॥
रामान्नास्ति परायणं परतरं | रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे| भो राममामुद्धर ||
अमृतवाणी संस्कृत भाषा-
अमृतवाणी संस्कृत भाषा-
अमृतवाणी संस्कृत भाषा-नैव क्लिष्टा न च कठिना |--किती सोपे,सुन्दर मधुर शब्द आहेत !चालीवर म्हणीन बघा,अपोआप तालात येईल.मन आनंदाने भरून जाईल.खरेच.हि माझी गोडशी,प्रेमळ आज्जी आहे ,अशी भावना मनात जागवा.नि म्हणून बघा प्रेमभावाने. आहे ना खरेच देव-वाणी?गोड,पवित्र प्रसादासारखी?अमृत म्हटल्यावर आणि वेगळे काही सांगायची गरज आहे कुठे?या एका ओळीचा अर्थ अंदाजे, सगळ्यांना लक्षात आलाच असेल.अचूक कोणी सांगेल?मी तुमचे काम सोपे करते. .............................. ... - (१)-नैव = न+एव | (२)-क्लिष्ट=क्लिष्ट=किचकट (किचकट हा शब्द हि क्लिष्ट पासून आला असे वाटते ना?) क्लिष्ट : हे विशेषण पुल्लिंगी आहे जसे -क्लिष्ट: कार्य:| हेच विशेषण स्त्रीलिंगी = क्लिष्टा जसे- क्लिष्टा समस्या | ......- ( 3)- च = आणि .........झाले एवढेच !सहज येईल ना आता?
आपले ज्ञान लिखित रुपात उपलब्ध नसूनही पिढ्यान पिढ्या जतन केले गेले ,तेही किती अचूक रित्या ! हे मोठे महत्त्वाचे नि सुनियोजित महत्कार्य ब्राह्मणांनी केले.पाठक,वेदपाठक, पुरोहित.आचार्य ,वेदाचार्य , द्विवेदी,त्रिवेदी चतुर्वेदी ह्या लोकांनी सहस्त्र, दश /शत सहस्त्रके =हजारो वर्षे हा ठेवा मुखोद्गत ज्ञान संचित म्हणून आपणास आज उपलब्ध करून दिला आहे.त्यांच्या या अतुलनीय कार्य बद्दल आपण ऋणी असले पाहिजे ...इंग्रजांनी आधुनिक शिक्षणाचा पाया, लॉर्ड मेकाले च्या धूर्त सल्ल्याने येथे घालून ,अस्मिता,-संस्कृतीवर पहिला घाव घातला. आपले ते सारे खोटे,मित्थ्या असे जनता मानू लागली.पुरावे देण्या एवढे चिकित्सक,सखोल ज्ञान बहुतेकांना नव्हते,असेल त्यांना जमले नाही .नि आपण न्यूनगंडाने ग्रस्त झालो. असो. आता इंग्रजीमुळे आपण जागतिक स्तरावर अधिराज्य करू शकतो(त्यामुळे मेकाले ही एक इष्टापत्ती मानू या.) तसे अग्रेसर राहू या .आणि अशा जन-जागृतीमुळे पुनश्च आपली आद्य संस्कृती जाणून तिचा अभिमान नक्कीच बाळगू या.
आपले सारे वेद,पुराणे,रामायण ,महाभारत,कितीतरी सुंदर नाटके,कथा-कादंबऱ्या,वैद्यकीय ज्ञान संस्कृतमध्ये आहे.(सुश्रुताने नाकाच्या शल्यक्रीयेची -प्लास्टिक सर्जरीची जी पद्धत हजारो वर्षांपूर्वी शोधली ,जवळजवळ तीच, तशीच आज पाश्चात्य सर्जनही वापरतात ....चरकाने ज्या औषधी वनस्पती,वस्तूंचे वर्णन ,गुणधर्म ,उपयोग सांगितले ते आज हि शाश्वत आहेत.आयुर्वेदाची अपायरहित गुणकारकता जाणून परदेशात लोकप्रियता वाढते आहे.आपण करंटे ते जणू तो सुदिन ) हे ज्ञान खरे तर उर्वरित ,कालौघात शिल्लक राहिले तेवढे ,काहीसे कमीच आहे.नि आहे ते सारेच किती बहुमूल्य आहे हे कळायला फार मोठ्या विद्वत्तेची गरज नाही.हवा फक्त थोडा भारताचा- आपल्या देशाचा ,संस्कृतीचा अभिमान. संस्कृत पुस्तकांना आग लावा-जाळून टाका म्हणणे म्हणजे आपल्या अज्ञानाचे,करण्तेपानाचे लक्षण आहे असेच म्हणावे लागेल.आज अमेरिकेच्या संसदेत (हाउस)वेदघोष होतो.इंग्लंडमध्ये अनेक शाळांतील मुले आवडीने संस्कृत शिकत आहेत. ते का?इथल्या ज्ञानाचे महत्त्व त्यांना पटले आहे.तिकडून येऊन ते आपल्याला सांगतील तेंव्हाच कळणार का आपल्याला ही महती ?
जयतु हिंदू-राष्ट्रम.

मायबोलीवर प्रेम
मायबोलीवर प्रेम ...!!
जे मराठी बोलतात,मायबोलीवर प्रेम हि करतात ,पण अशुद्ध किंवा चुकीचे ,किंवा खिचडी(मिश्र भाषेत)बोलतात यावर काही नेटाने करावे असे वाटते.
आपण मराठी,हिंदी आणि इंग्रजी शिकतो.या भाषा एकमेकीत मिसळून वापरतो.या साऱ्या भाषा भगिनी आहेत.मला सर्वच प्रिय आहेत. पण ,विचार करा-इंग्रजी लिहिता-बोलतांना हिंदी/मराठी शब्द आपण वापरू का? वापरतो का?नाही ना ? का नाही?
अशी खिचडी भाषा योग्य नाही हे आपण अंतर्मनात मान्य करतो,हे बरोबरच आहे.
पण माय -मावशीच्या बाबतीत अनास्था दाखवतो.मराठीत खुशाल इंग्रजी शब्द मिसळतो.
कोणा -कोणाला तर यात अभिमानहि वाटतो.पण,खरे सांगा मित्रांनो,हे बरे का?
म्हणून ,मला असे वाटते की ,-एखाद्या facebook समूहाच्या भित्तीवर सदर, असे पान चालवता येईल. अनवट+रोजचीच वाक्ये, चुकीचे-शब्द ह्याची सुधारित/शुद्ध रूपे ...दैनंदिन भाषेचा दर्जा.....इ. काही करता येईल ना?
मग,असा एक उपक्रम आपण येथेच सुरू करून नियमितपणे राबवला तर? असा एक संस्कृत साठी लोकाग्रहास्तव आपण चालवत आहोतच आपल्या परिवारात.रोजच्या वापरातील साधे ,सोपे ,अनवधानाने सहजच बोलले जाणारे शब्द आणि वाक्ये घेवू या? चालेल?ठीक तर मग.आजच शुभारंभ करू या.

जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमी
*सुधीर फडके हे नाव माहित नसलेला मराठी माणूस सापडणे कठीण. प्रत्येक मराठी मध्यमवयीन व्यक्तीस ते ,घराघरात पोचलेल्या गीत रामायणामुळे प्रिय आहेतच.पण अमराठी लोक ही त्यांना ज्योतीकलश छलके ह्या नितांत सुंदर गाण्यामुळे ओळखत असणार नि आवडत ही असणार असा विश्वास वाटतो..गाण्यातील तर ते ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होतेच .त्यातील सर्व पातळ्यांवर त्यांनी छाप /मुद्रा उठवणारे काम केल्याचे आपण जाणतोच. हिंदी ,मराठी विविध प्रकारे गायन,वादन,दिग्दर्शन(संगीत आणि मालिका)मालिका निर्मितीत सहभाग,उत्तन माणूस हे सारे पैलू माहित आहेत.पण जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमी होते हे कितीजणांना माहीत असेल ?गोवा मुक्ती संग्रामात सहभाग,दादरा-नगर-हवेली /दिव हे भाग मुक्त( देश स्वतन्त्र् झाल्यानंतर कैक वर्र्षानी )करताना तर सशस्त्र सक्रीय सह्भाघोता त्यांचा.आणखीन एक मोठे आणि अप्रसिद्ध कार्य म्हणजे गोव्यातील कित्येक टन सोने आणि देशभक्त कैदी जे पोर्तुगीजांनी तिकडे नेऊन ठेवले ते २०-२५ वर्षे तिकडेच पडले होते.शासनाला त्यात रसच नव्हता.त्यात एक होते श्री. मोहनजी रानडे !इतकी वर्षे काळकोठडीत त्यांनी कसे काढले असतील. बाबुजींनी त्यांना मायभूमीत परत आणले.असे निगर्वी,प्रसिद्धी परांग्मुख होते आपले बाबुजी !
साने गुरुजी आणि आपण
साने गुरुजी आणि आपण त्यांची नवी जुनी मुले....
... "या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तीनही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ; ज्ञानहीन प...्रेम तेही फुकट; प्रेमज्ञानहीन शक्ति व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली; परंतु दुसर्यावर प्रेम नसेल, तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. मजजवळ ज्ञान आहे; परंतु दुसर्यावर प्रेम नसेल, तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसर्यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल, तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे; परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी, याचे ज्ञान जर तिला नसेल, तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये, तेही ती देईल आणि तिच्या आंधळ्या प्रेमानेच बाळ मरून जाईल! समजा, आईजवळ प्रेम आहे. ज्ञानही आहे; परंतु ती जर स्वतः अशक्त आणि पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास; ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तीनहींची वाढ जीवनात हवी."
_ साने गुरुजी.
.
- -खूप छान आणि उपयुक्त संयत भाषेत पाजलेले जणू काही बालामृतच. पण आज हे असे उपयुक्त ,सकस ( लेखन ) अन्न कोणाला हवेय ?आज हवा ( नेटवर नेटाने झटपट करून काढलेले झटपट कोपी-पेस्त पांचट किस्से, विनोद आणि कविता ..) फास्ट आणि जंक फूड ,पिझ्झा....साने गुरुजी यांचे मायेची माया लावून बोललेले बोल ,त्याला कोणी बरे कसा बरे लावील बोल ? बोल बोल म्हणता ,गेली ७५ + वर्षे होऊन गेली , साने गुरुजी महाराष्टाला रंजन आणि अंजन एक शांत निरंजन होऊन देत आहेत. सुधास पत्रे लिहून त्यांनी साऱ्यांनाच प्रेमळ संदेश दिले. शामच्या आईचा संस्कार घेऊन ,जणू तो अलंकार लेऊन आमची पिढी मोठी झाली.

स्वामी विवेकानंद म्हणतात-
*
स्वामी विवेकानंद म्हणतात-
" धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही .कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही.किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना अ सून टयनचा धर्माशी काहीएक संबंध नाही. तेंव्हा या बद्दल ऊटसूट धर्माला वेठीस धरण्याचे काही कारण नाही।" हे त्याकालाशी सुसंगत प्र!तपादन आहे.स्वामीजींनी म्हटलेले बाकी सारे खरेच.ते चूक कसे असतील?शंकाच नको. वर्ण व्यवस्था पुरातन कालीन बाब आहे.आज आपण सुसंस्कृत लोक जातीभेद जवळजवळ मानतच नाही. नाहीतर बाहेरचे कोणी ,कधी काही खाल्लेच नसते. सार्वजनिक वाहनातून प्रवासच केला नसता. हिंदू धरमाची उच्च तत्वे कोणी समजूनच घेत नाही.रामकृष्ण परमहन्सांनी (स्वामीजींचे आध्यात्मिक गुरु ) तिन्ही धर्माची कठोर साधना करून प्रत्येकाचे अंतिम तत्व अनुभवले होते.ते होते अंतिम सत्य...मुक्ती,दिव्य प्रकाश.समाज सुधारकांनी केवळ १-२ वर्षे खरी साधना करून पहावी. थोतांड म्हणणारेही दिव्यत्त्वाची प्रचीती घेतील,मला खात्री आहे. त्यांचे मत बदलेल.पण ,खडीसाखरेच्या खाद्याला हट्टाने ,ण चाखता दुराग्रह पूर्वक तुरटी म्हणणेच सोपे .नाही का ?आपले सर्व ज्ञान खरे आहे. हवे त्यांनी स्वानुभव घ्यावा,काळाच्या कसोटीवर उतरणारे हे कालातीत शास्त्र आहे. हवी फक्त खरी इच्छा .तिचीच तर येथे वा न वा ..
" धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही .कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही.किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना अस्वामी विवेकानंद म्हणतात-
धरती के लाल -लाल बहादूर यांची थोरवी.
असा नेता ,जाणता ! की प्रेमात बुडाली जनता....स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख स्वातंत्र्य सेनानी, भारताचे तिसरे माजी पंतप्रधान.'जय जवान ,जय किसान' या प्रेरक घोषणे करिता प्रसिद्ध. यांच्या कार्यकालात १९६५ चे भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले.आणि मस्तवाल पाकचे कम्बरडे मोडले.उनोच्या सूचनेने युद्धबंदी झाली.आणि ताश्कंद येथे जड मनाने , तहावर स्वाक्षरी करावी लागली. त्याच रात्री अनपेक्षितपणे तेथेच त्यांचा झटक्याने मृत्यू झाला.सारा देश दु:खात बुडाला.जनस!मान्यांचा मनमिळाऊ,लोकप्रिय सत्शील नेता गेला. नेता असावा तर असा.असा थोर नेता पुन्हा या देशाच्या दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षात अन्य झाला नाही, होणे नाही.
जेमतेम वर्षभरच पंतप्रधानपदवर राहिलेले पण देशाच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात अजरामर झालेले पंतप्रधान म्हणूनच लालबहादूर शास्त्री यांची साऱ्यांना आठवण राहील.अशी आहे या धरती के लाल -लाल बहादूर यांची थोरवी.

* "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "
*आज सर्व पितृ अमावास्या.मृत आई-वडील,पूर्वजांचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करावे.स्मृतीप्रीत्यर्थ जराजूंना दान /मदत व्हावी असा महान उद्देश ठवून इतर कर्मकांडे करतात. काल बदलला. पूर्वी ब्राह्मण विपन्नावस्थेत राहून समाजाला शिक्षित ,सुसंस्कारित करत. त्याची फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात ,समाज कृतद्न्यता म्हणून दान देत असे.ते योग्यही होते. कालमान परत्त्वे थोडासा बदल (काही लोक तर काहीच करत नाहीत. ही मोठीच सु...धारणा आणि बदल !)
* कालमान परत्त्वे रुढी ,परंपरा आणि कर्मकांडामध्ये बदल होवू शकतो. आपण करू शकतो. विधीही करावे ते न जमल्यास निदान दान करावे.असे तुम्हालाही वाटते ना ?मुस्लीम जकात देतात (हाच पैसा गरीबानसोबतच दहश्त्वाद्यांनाही मिळतो म्हणतात.) आपण ही पूर्वीप्रमाणे सुयोग्य सत्पात्री दान का करू नये ?
* "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "असे आमचे आजोबा म्हणत. म्हणजे वाळलेल्या पिकाऐवजी सागरात पाऊस पडून ,आणि (काही )घरी जेवून संतुष्ट असलेल्यास जेवू घालून काय उपयोग?आम्ही श्राद्ध-पक्ष,तारखेने स्मृतीदिन,दिवाळी,व नातवाचा वाढदिवस (कधी कधी राष्ट्रीय संण )यानिमित्त अनाथाश्रमास (जिथे खरेच उत्तम कार्य शासन मदतीशिवाय चालते)जमेल तशी आर्थीक मदत करतो. ही मदतच असते. दान ,उपकार नव्हे.

अपरिमित नुकसान मुलींचेच होते ना?
आज सर्व् पित्री अमावास्या . आज भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस.उद्या आश्विन शुद्ध प्रतिपदा (आश्विनाचा पहिला दिवस )घरोघरी देवीचे नवरात्र ,उपवास सुरु होणार. 'उपवास' चा खरा अर्थ उप+वास=देवाच्या संगतीत वास करणे =मानसिक दृष्ट्या भक्तीत रामाने,सत्कृत्य करणे असा होतो. पण आजकाल,सर्वत्र ,विशेषत:मुंबईत ( गुजराथ व इतरांचे सोडा)काय चित्र दिसते ? गरबा-दांडियाचा जल्लोष(काही ठिकाणी तर हैदोस).जिकडे तिकडे हीच धाम धू...म!नाचायला,एकत्र यायला,थोडा बदल-मौज -सांस्कृतिक देवाण घेवाण याला काहीच आक्षेप नसावा.पण,त्यानानातर जे 'प्रकार ' होतात,त्यात अपरिमित नुकसान मुलींचेच होते ना?ते आणि त्यास कारण ठरणाऱ्या गोष्टी मुलींनी नक्कीच टाळाव्यात. मुंबईतील स्त्री रोग तज्ञाकडे नोव्हे-डिसे.महिन्यात तरुणींची वाढती संख्या समाजहितैषी लोकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. अधिक काय बोलावे ?
गरीबीवर एक अहवाल.
शासकीय समितीने गरीबीवर एक अहवाल शासनाकडे सोपवला.आणि पंतप्रधान(ते पंत नाहीत नि प्रधान नामधारीच ) सिंग यांनी तो स्वीकारला देखील !इंदिराजींनी गरीबी हटावचा घोष केला.हटली नाही. तेव्हा आता -" गरिबोको हटाव -गरिबी छुपाव|"असा कार्यक्रम हाती घेतलेला दिसतोय. २६ रुपयात काय २६००० रुपयात ज्यांचा दिवस भागत नाही (आठवा--शशी थरूर इत्यादीची घर मिळाले नाही मंत्री होताच म्हणून हॉटेलची बिले करदात्यांच्या बोकांडी) असे ल...ोक २६ रुपयात लोक मजेत राहतात असा निष्कर्ष मानत आहेत.गेल्या जनगणनेत ज्याच्या घरात दुचाकी (=सायकलच, इथ ,दुचाकी म्हणजे स्कुटर नव्हे )आणि पंखा आहे ते गरीबच नव्हेत असा निकष होता म्हणे .आता बोला !म्हणजे-पदयात्रेचा सक्तीचा कार्यक्रम जनतेनेच राबवावा . आणि रक्तदानाची सवयही अंगी बाणवावी. पंखा ( फ्यान )लावून डासांना उपाशी मारणे अहिंसेत बसत नसावे.सामान्य नागरिकांनी डासांना रक्तदान करून पुढे सतत होणाऱ्या रक्तपाताची सवय व्हावी असा उदात्त हेतू असावा . पुढे स्फोट,हाणामाऱ्या नि पोलिसांचे असहकारी धोरण,शासन मान्य गोळीबार( उ. प्र. आणि मावळचा गोळीबार ),गुंड नेमबाजांचे लक्ष्यभेदी खेळ( जे.डे. हत्या आठवतच असेल ना) , अतिरेकी हल्ले ,वारंवार होणारे अपघात,शेतकऱ्यांचे -,पिडीत स्त्रियांचे-,वृद्ध नागरिकांचे भीषण मृत्यू,( हत्या वा आत्महत्या) अशा घटना तर घडतच राहणार आहेत. लोकसंख्येला आला बसेल यातच कोणी आनंद मनात असावे कदाचित ....मेंदू काम करेनासा होतो की काय असा ' मनमोहक' कार्यक्रम सरकार राबवत आहे का? आजचे हे नेते म्हणजे ,- ना हे जनतेचे सेवक, ना रक्षक.म्हणावे का यांना भक्षक ?बिचाऱ्या प्रामाणिक करदात्याच्या कष्टाच्या पैशांवर फुकट पोसलेले हे मस्तवाल .... रोज तीळतीळ मरणाऱ्या नागरिकांच्या टाळूवरचे लोणी खावून अधिक गब्बर होताहेत म्हणावे का? सामान्य नागरिकाच्या सहनशक्तीलाही मर्यादा आहेत,तरुण चवताळून उठत आहेत.सामाजिक गटांवर या मुलांना आवरणे जिकीरीचे होत आहे.तुटेपर्यंत ताणू नये हे या उद्धवाच्या सरकारला कोणी सांगावे ?
तुझी पत्रे हल्ली येतच नाहीत,छान लिहितेस .बरे वाटते ग." ...
तुझी पत्रे हल्ली येतच नाहीत,छान लिहितेस .बरे वाटते ग." ...
.
आज अचानक,एक प्रश्न पडला की ,किती दिवस झाले कोणाचे घरगुती पत्र च आले नाही. मग,मीच मला प्रतिप्रश्न केला की -"तू तरी लिहिलेस का कोणाला? " आणि मीच माझ्याशी खजील होऊन कबुली देऊन टाकली कि -... " नाही.पण,ते जरा चुकलेच माझे.....आता लिहीन . " . *ते पत्र लेखनाचे सुख आणि आलेले पत्र वा...चण्याचा अवर्णनीय आनंद ! तो पोस्त -मनची आतुरतेने वाट पाहण्याचा अनोखा अनुभव.पत्र येताच अत्यानंदाने वाचण्याची कोण घाई.....! सुहृदांचे पत्र एकदा वाचून समाधानच व्हायचे नाही .माहेरचे कुशल सांगणारे, विचारणारे पत्र म्हणजे... स्त्रियांना काही मोठे भांडार गवसल्याचा हर्ष. मग ,पुन:प्रत्ययाचा निवांत आनंद घेत ते पत्र सावकाश पुन:पुन्हा वाचण्याचे औरच समाधान.आज हे विचार मनात येत असतांना ,आता ठरवते आहे कि,मागच्या पिढीतील सारे सासर -माहेरचे अतिवृद्ध माझे नातलग उरलेत तरी कितीसे....त्या साऱ्यांना ( काही दिवस रोज एक एक लिहिले तरी प्रत्येकाला लिहायला एक पक्ष पुरेल.) " तुझी पत्रे हल्ली येतच नाहीत,छान लिहितेस .बरे वाटते ग "असे त्यांनी प्रेमाने म्हणावे आणि हसण्यावारी नेवून ,दुर् -ध्वनीची सोपी वाटच धरावी असेच हल्ली घडते. आज मात्र एक तरी पत्र लिहीनच म्हणते. आधी लिहीन शय्येवरच्या जावूबाईंना . ....आभार , असा प्रश्न समूहावर उपस्थित केल्या बद्दल,सज्जन गृहस्था ! मी आता डोळे पुसते आहे. पण,ते आज तुम्ही उघडलेत.
बालपण सुखाचे.!
बालपण सुखाचेच असते.मात्र ते अधिक सुरम्य होते असे मोठे झाल्यावरच वाटते. जी गोष्ट हातातून निसटून जाते ती अधिक मोलाची भासते.आजचे तारुण्यही मोलाचेच आहे .ते असो. स्मरणरंजनाचा आनंद अवर्ननीयच असतो. माझा काळ वेगळा. त्यात गोळ्या=चोकोलेत्स ला मुळीच जागा नाही. पण,नवल म्हणजे माझ्या मुलांनाही बालपण म्हटल्यावर दुसरेच घरगुती पदार्थ आठवत असतील.आमच्या लहानपणी दशहरा-संक्रांतीला सोने द्यायला आणि तिळगुळ घ्यायला आम्ही... शेजारी,गुरुजन,आणि मैत्रिणींकडे जात असू. तेथे खाऊ म्हणून क्वचित गोळी मिळे.एक नव्या पैशात एक वा अधिक येत असाव्या.साखरेच्या पाकाच्या त्या गोळ्यांवर ४-६ रंगाच्या वक्र रेषा असतं.अगदी चांगल आठवते ते म्हणजे शहरी पाहुण्यांनी आणलेली १०-१२ च रावल्गावची कडक (,तेच त्याचे वैशिष्ठ्य असावे ) टोफी=चोकोलेत्स.ती ,आम्ही ४ सख्खी आणि २-३ चुलत भावंडे +कधी शेजारची मुले ह्यात वाटून घ्यायची. उरली तर ती लहान भावंडे पुरवून पुरवून खात आणि कधी आम्हा मोठ्यांना "टूक टूक माकड "..... म्हणून चिडवून खात. असे खाण्यात त्यांना शतपट आनंद ..! खरेच बालपणीचा काळ सुखाचा,वाटे मज तो आज परतावा साचा |--इति ज जो. ..!!
कृतार्थ जीवन !
मिळाले त्यात सुख मानून कृतार्थ जीवन जगणारे फारच कमी लोक जगात दिसतील.--साधी गोष्ट-....भाजी विकत घेतांना हातातली जुडी किंवा भोपल्यापेक्षा दुसऱ्याच्या हातातला बरा वाटतो. आपल्या साडीपेक्षा दुसरीची छान आहे का ही शंका कुणा कुणाला छळते.छोट्या मुलांना मित्राची व जाहिरातीतली आई आवडते. आणि...जाऊ देत . इतकेच दाखले पुरेसे......पण मला मात्र माझा देश फार फार आवडतो.,माझे अमाप कष्टाने वर आलेले सूस्वभावी आई -वडील ...,कुटुंब ,माझ्यावरील केलेले संस्कार,माझे सामान्य -साधेसेच रूप(ज्यावर मी कधीही,कोणतेही वृथा प्रयोग करत नाही ),आमची पती-पत्नीची पूर्वीची निम्न् वर्गीय आर्थिक स्थिती आणि आमचे अपार कष्टाचे स्वाभिमानी जीवन ....हे सारे जे जसे होते आणि आता आहे, ते मला फार आवडते.त्यामुळेच मी उतले नाही ,मातले नाही ..पण आज समाधानी आहे.शांत चित्ताने झोपू शकते....हे लाखमोलाचे धडधाकट शरीर,स्मरणशक्ती नी बुद्धिमत्ता..सोन्यासारखी मुले ..आणि नातू !अधिक काय हवे ? देवा तू किती कृपावंत होऊन हे सारे मला दिलेस. मी खरेच कृतज्ञ आहे . अगदी कृतार्थ आहे......असे.... ,नव्हे याहून ही आपण ही सारे सुखी -समाधानी असावे ही आपण सर्वांना शुभ कामना !
ase aapule sanchit ,nako rahu yaa wanchit !
दसरा आणि सोने लुटणे * "दसऱ्याला एवढी आपट्याची झाडे ओरबाडल्यासारखी तोडून ,त्याची पाने एकमेकांना वाटावीत असे शास्त्र खरेच पाळलेच पाहिजे का ?" ....."जुनी कर्मकांडे आणि कालबाह्य रूढी-परंपरा आपण आता सोडून द्याव्यात. मी असल्या घाणेरड्या ,झाडे मारणाऱ्या गोष्टी करणार नाही,कोणाला करू देणार नाही. .." गेल्या दोन -चार दिवसात अशी वाक्ये आणि मत -मतांतरे कानावर पडत आहेत. यावर वादही झडत आहेत. ताबडतोबीने देण्यासारखे ठोस उत्तर माझ्याकडे नव्हते .पण,सामान्य ज्ञानाच्या भरवशावर मी उत्तर दिले कि ... ..... ** आपट्याची पाने जुळी( -युग्म रुपात )असतात.तसे आपण सायुज्य= परस्परांशी जोडून राहावे हा त्यापाठी सुविचार.या दिवसात पानगळ होते. काही पाने तोडली तरी झाडाचे आपण म्हणतो तसे मरण ओढवत नाही. मात्र गरजेहून अधिक सारेच तोडू नये.तसे होतही नसावे. मर्यादित प्रमाणात छाटणी झाल्यास झाडाची वाढ झाल्याचे दिसते आणि खूप नवीन पालवी येतच असते. सारे सण-परंपरा विचारपूर्वक योजिलेल्या आहेत.आपण बरेचदा ते समजावून घेत नाही. आंबा,झेंडू ,कडूनिंब हि पाने फुले तोरणास का घ्यावी ?तर अतिशय योग्य रीतीने ...ती सावलीत वाळतात. नीट साठवली जाऊ शकतात.ती जाळली कि डास नष्ट होतात. पाडव्यास निंब डहाळा दारास लावतात. ऋतू बदल काळ असतो हा .यावेळी व्हायरसेस (म्हणजे विष अणू) अधिक असतात. त्याला आळा बसतो त्या पानांनी. हीच पाने यावेळीच आणलेल्या साठवणुकीच्या धान्यात टाकतात. ओली पाने धान्यात टाकल्यास बुरशी येईल.तर हे शास्त्रशुद्ध वाळवणे. विचारू नका.थोतांड मानू नका.लॉर्ड मेकालेला विसरा .विचारण्यापेक्षा स्वत: विचार करून बघा. पाश्चात्य शाळांत संस्कृत शिकवले जातेय. आपले ज्ञान असून त्याचे पेटंट परदेशी लोक घेत आहेत. मुलानो,जागे व्हा.रघुनाथ माशेलकरांनी हळद,कडूनिम्ब,बासमती पेटंटचा लढा जिंकला. आता आपण पुढे होऊ या,नि आपल्या ह्या संचिताचे रक्षण करू या.
सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा:-
सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा:-
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो..... रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही ...का...ळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला.गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- ''कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.'' परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, ''मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे.'' ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली.परंतु त्याने फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

Subscribe to:
Posts (Atom)
कामयेत दुक्खतप्तानाम प्राणीनां आर्तिनाशनम
I don't desire heaven, kingdom or liberation. I want to eradicate the pain of suffering living beings.
( १) -न ( =नाही ) + तू (=आणि ) +कामयेत (=इच्छितो ) + न स्वर्गं + न राज्यं (=सत्ता अधिकार,राज्य ) + न पुनर्भवम (हवा तो जन्म पुन्हा घेणे ) +कामयेत | .. ( २ )- दु:ख तप्तानाम (=दु:खाने त्रासलेल्या ,पोळलेल्या ) + प्राणिनाम (प्राण्यांचे ) +आरती _आर्त =अतीव वेदना त्रास भोग यातून ) +नाशनम (=नष्ट करणे )
( देवा ,) मला न स्वर्ग हवा न राज्य न पुनर्जन्माची हाव . (केवळ ) दु:खाच्या आगीत पोळलेल्या जीवांचे अतीव दु:ख नाश करावे हेच मी इच्छितो.|