Monday, 12 March 2018

* "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "

       


#संस्कृतमालिका

वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं |
‎*आज सर्वपितृ अमावास्या.मृत आई-वडील,पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे.स्मृतीप्रीत्यर्थ गरजूंना दान /मदत व्हावी असा   उद्देश ठरवून इतर कर्मकांडे करावीत . काहीजण ते करतातच .
का
ळ   बदलला. पूर्वी ब्राह्मण विपन्नावस्थेत राहून समाजाला शिक्षित ,सुसंस्कारित करत. त्याची फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात ,समाज कृतद्न्यता म्हणून दान देत असे.ते योग्यही होते. कालमानपरत्त्वे थोडासा बदल करून  आपण वंचित,  आणि खऱ्याखुऱ्या गरजूंना सत्पात्री सहाय्य केल्यास आपल्यालाही समाधान मिळेल .
(काही 
सुधारक लोक तर ह्यापैकी काहीच करत नाहीत. ही मोठीच सुधारणा आणि बदल...!!)
:D


* कालमानपरत्त्वे रुढी ,परंपरा आणि कर्मकांडामध्ये बदल होवू शकतो. आपण करू शकतो. आपल्या मातापिता  आणि पूर्वजांविषयीच्या श्रद्धायुक्त भावना  आणि श्रद्धांजली म्हणून हवे तर विधीही करावे , ते न जमल्यास निदान दान करावे... असे तुम्हालाही वाटते ना ?
मुस्लीम बांधव समाजासाठी आपल्या  उत्पन्नातील  काही भाग जकात म्हणून  देतात (हाच पैसा गरीबाना  मिळतो म्हणतात.) आपणही पूर्वीप्रमाणे सुयोग्य सत्पात्री दान का करू नये ?
*
 "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "
असे आमचे आजोबा , आपल्या  कुटुंबियांना  सांगत . सामाजिक  भान  असावे  ह्या  अर्थाने  हा श्लोक म्हणत. म्हणजे ,~
शेतात वाळ
त चालेल्या पिकाना संजीवनी देणारा पाऊस शेतीऐवजी सागरात पाऊस पडून काय उपयोग ,आणि   जेवून संतुष्ट असलेल्यास जेवू घालून काय उपयोग ? पाऊस  पडूनही  पिकांच्या  दृष्टीने वाया  जाणार . आणि  भुकेजल्याच्या  दृष्टीने  पाहिल्यास ते अन्नदान   वाया  जाणार . 
आम्ही श्राद्ध-पक्ष,  अन् ह्या  सोबतच तारखेने स्मृतीदिन / वर्धापनदिन , कुटुंबीयांचा वाढदिवस ,दसरा ~ दिवाळी  हे सण    ( कधी कधी पंधरा  ऑगस्ट  , सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय संण ) या निमित्त (जिथे खरेच उत्तम कार्य , शासन मदतीशिवायहि  चालते , तेथे ...) वृद्धाश्रम ,अनाथाश्रमास सस्नेह 'भेट'  देतो. 
यथाशक्ती  काहीतरी  देतो. ते दान  नाही  तर ,  प्रेमाची  एक भेट असते.  

Wednesday, 25 February 2015

Friday, 24 August 2012

माज !*-नव्या युगाचे आम्ही नवे मनु |,उचलू आव्हानाचे युगाचे आम्ही नवे मनु |,उचलू आव्हानाचे शिव-धनू,||तमा कष्टांची न मानू |,विश्व नभामधी जणू तळपत राणू

"गर्वाने म्हणा मी  ** आहे "..............
"मला माज आहे मी मराठी असण्याचा ."....
ही आणि अशी वाक्ये आजकाल कितीतरी भित्तींवर (=भिंती /walls ) वारंवार पाहायला मिळते.कधी कधी तर, वाचून पाठ आणि गुळगुळीत झालेली ही घोष वाक्ये कोण कुठून आणून अशी पानांवर ठेवते ते पहावे असे वाटते. असो मुलांनो,नकलून चिकटवणे (copy -paste ) हे केवळ एक सोपे तंत्र आहे .
 पण असे आयते  उचलून खपवण्यापेक्षा आपल्या  शब्दात  आपले  विचार  लिहिले  तर...
ह्यासाठी आधी  खूप वाचा.उत्तमोत्तम लेख , साहित्य वाचा. मग आपोआप स्वत:ची   छान छान वाक्ये तुम्ही  स्वत:च  लिहू शकाल...!
गर्वाने गर्जना करून काय होणार? त्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करू,कष्ट करू .आणि असे सक्षम,सबळ होऊ या की -

*-नव्या युगाचे आम्ही नवे मनु |,उचलू आव्हानाचे  धनु ......

*-नव्या युगाचे आम्ही नवे मनु |
उचलू आव्हानाचे शिव-धनू ||
तमा कष्टांची न मानू |
विश्व नभामधी जणू तळपत राणू - - -


साऱ्या जगात आपण  भारतीय  आज चमकत आहोत. ह्याहून अधिक तेजाने तळपत राहू.


२)- "गर्व से कहो हम ...."

ही घोषणा हिंदीत योग्य आहे.मराठीत 'गर्व ' म्हणजे अहंकार.,जो कधी असू नये.गर्वाचे घर खाली...माहित आहे ना? (काही लोक तर यावर कडी करतात - "माज आहे " म्हणे...

अरेरे !! काय ही भाषा.....
गर्जेल तो करील काय ?
आजवर आपण न बोलता प्रगती करत गेलो.आताही करू या.
फारतर , मराठीत म्हणा.. " अभिमान आहे "  - मात्र गर्व नव्हे.!
पण ते  काहीही  म्हणूच नका ना .करूनच दाखवू या.चला तर  मग, लागा मुलांनो कामाला.....

facebook

Wednesday, 12 October 2011

ek kaamanaa..



    •  न तु अहं कामयेत स्वर्गम न राज्यम् न पुनर्भवम
      कामयेत दुक्खतप्तानाम प्राणीनां आर्तिनाशनम

      I don't desire heaven, kingdom or liberation. I want to eradicate the pain of suffering living beings.
      ( १) -न ( =नाही ) + तू (=आणि ) +कामयेत (=इच्छितो ) + न स्वर्गं + न राज्यं (=सत्ता अधिकार,राज्य ) + न पुनर्भवम (हवा तो जन्म पुन्हा घेणे ) +कामयेत | .. ( २ )- दु:ख तप्तानाम (=दु:खाने त्रासलेल्या ,पोळलेल्या ) + प्राणिनाम (प्राण्यांचे ) +आरती _आर्त =अतीव वेदना त्रास भोग यातून ) +नाशनम (=नष्ट करणे )
      ( देवा ,) मला न स्वर्ग हवा न राज्य न पुनर्जन्माची हाव . (केवळ ) दु:खाच्या आगीत पोळलेल्या जीवांचे अतीव दु:ख नाश करावे हेच मी इच्छितो.|

  • Tuesday, 11 October 2011

           
    #-(१)-#
    -वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः।
    स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥ ..=वनांना (वनानि=अनेक वने ) जळताना अग्नी=वन्हीला ,मारुत =वारा हा सखा होतो(सखा होऊन साह्य करतो.वार्यामुळे वणवा भडकतो.).तोच (स एव)वारा दिव्याचा नाश करतो(विझवतो).कृश=अशक्त/दुबळ्या
    चे कसले मित्रत्त्व ? (समर्थ असल्यास मित्र मदत करतात.वाईट कामातही सहाय्य देतात.. पण दुर्बलाला मात्र मित्र नसतात,असले तरी शत्रू होऊन चांगल्य...ा कामात विघ्ने आणतात. असा काहीसा अर्थ ......... ****अजा पुत्रं बलिंम दद्यात ,देवो दुर्बल घातक:| अशाच अर्थाचे वचन आहे. आता सांगाल या वाचनाचा अर्थ? अजा=शेळी ... मित्रांनो,आता जमेल.बघा.)
    *(२)*
    शतॆषु जायतॆ शूरः|                                                                             सहस्रॆषु च पण्डितः ।
    वक्ता दशसहस्रेषु|
    दाता भवति वा न वा ॥
    शंभरात एक शूर होतो (व्यक्तीत)शत=शंभर.जायते=होतो/होते.)
    हजारात एक विद्वान , पन्डीत होतो. वक्ता,उत्तम भाषण करणारा दहा हजारात एक होतो.तर दानी मात्र होतो किंवा होतच नाही.( खरा उदार,दाता कुठेच आढळत नाही.(आचार्य अत्रेन्बद्दल वक्ता दश- सहस्त्रेषु -असे म्हणत असत.नि तेही प्रत्येक गोष्ट ठसवण्यासाठी " दहा हज्जार वर्षात असे ---झाले नाही " असे म्हणत असत
    .
    · Comment · September 24


                  
    #हा एक खूप सोप्पा श्लोक पाहू या -
    १)- जानामि= मला माहीत आहे,ज्ञात असणे , स्वत: जाणणे.. 
    -२)_ते/तव=तुला/तुव
     ३)- क्षम्यतां -क्षमा कर.

    * आवाहनं न जानामि ,न जानामि विसर्जनं, पुजाते न जानामि , क्षम्यताम् परमेश्वर||



        जयाचे पत्र -मैत्रीचे सत्र. ‎(देवा तुला) आवाहन करून (कसे बोलावू) ते मी जाणत नाही,विसर्जनही(कसे करावे ), ते मला ठाऊक नाही ,तुला पुजावे तेही मला माहित नाही ,परमेश्वरा मला क्षमा कर.

    व्याकरणानुसार अनुक्रमाने विभक्ती

           राम या शब्दाला , व्याकरणानुसार अनुक्रमाने विभक्ती या श्लोकात कशा आहेत ते पाहू या.मराठी,संस्कृतात त्या सात असतात.               .१ ) - प्रथमा= राम:.(राम आला) =राम:/रामो राजमणी सदा विजयते.=राम सतत विजयी होतो.                                                    -२ )- द्वितिया= रामं (रामा ला भजतो ) raamam रमेशं भजे=मी रामाला भजतो/भक्ति करतो.                                                                 - ३ )तृतीया =रामेणा (रामा ने ) रामाने निशाचर राक्षसान्चा नाश केला - 4 )- चतुर्थी =रामाय (रामा ला )रामाला नमस्कार असो/करतो/करते..  - ५ ) पञ्चमी =रामात (रामा ने/ हून/पेक्षा) रामाहून कोणी श्रेष्ठ नाही . .. - ६ ) षष्ठी =रामस्य (रामाचे/ची/च्या/चा ) रामाचा दास आहे.-मी .......... - ७ )सप्तमी =रामे (रामा त /मध्ये/ )रामात माझे चित्त लागू दे. .......      - ८ )संबोधनं = नाव (बोलावणे./संबोधित करणे/हाक देणे )हे /भो/अहो राम ,मल तार,उद्दर,उद्धार कर.