Tuesday, 11 October 2011

जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमी

                     
‎                          *सुधीर फडके हे नाव माहित नसलेला मराठी माणूस सापडणे कठीण. प्रत्येक मराठी मध्यमवयीन व्यक्तीस ते ,घराघरात पोचलेल्या गीत रामायणामुळे प्रिय आहेतच.पण अमराठी लोक ही त्यांना ज्योतीकलश छलके ह्या नितांत सुंदर गाण्यामुळे ओळखत असणार नि आवडत ही असणार असा विश्वास वाटतो..गाण्यातील तर ते ऋषीतुल्य व्यक्तिमत्व होतेच .त्यातील सर्व पातळ्यांवर त्यांनी छाप /मुद्रा उठवणारे काम केल्याचे आपण जाणतोच. हिंदी ,मराठी विविध प्रकारे गायन,वादन,दिग्दर्शन(संगीत आणि मालिका)मालिका निर्मितीत सहभाग,उत्तन माणूस हे सारे पैलू माहित आहेत.पण जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमी होते हे कितीजणांना माहीत असेल ?गोवा मुक्ती संग्रामात सहभाग,दादरा-नगर-हवेली /दिव हे भाग मुक्त( देश स्वतन्त्र् झाल्यानंतर कैक वर्र्षानी )करताना तर सशस्त्र सक्रीय सह्भाघोता त्यांचा.आणखीन एक मोठे आणि अप्रसिद्ध कार्य म्हणजे गोव्यातील कित्येक टन सोने आणि देशभक्त कैदी जे पोर्तुगीजांनी तिकडे नेऊन ठेवले ते २०-२५ वर्षे तिकडेच पडले होते.शासनाला त्यात रसच नव्हता.त्यात एक होते श्री. मोहनजी रानडे !इतकी वर्षे काळकोठडीत त्यांनी कसे काढले असतील. बाबुजींनी त्यांना मायभूमीत परत आणले.असे निगर्वी,प्रसिद्धी परांग्मुख होते आपले बाबुजी !