आज सर्व् पित्री अमावास्या . आज भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस.उद्या आश्विन शुद्ध प्रतिपदा (आश्विनाचा पहिला दिवस )घरोघरी देवीचे नवरात्र ,उपवास सुरु होणार. 'उपवास' चा खरा अर्थ उप+वास=देवाच्या संगतीत वास करणे =मानसिक दृष्ट्या भक्तीत रामाने,सत्कृत्य करणे असा होतो. पण आजकाल,सर्वत्र ,विशेषत:मुंबईत ( गुजराथ व इतरांचे सोडा)काय चित्र दिसते ? गरबा-दांडियाचा जल्लोष(काही ठिकाणी तर हैदोस).जिकडे तिकडे हीच धाम धू
...म!नाचायला,एकत्र यायला,थोडा बदल-मौज -सांस्कृतिक देवाण घेवाण याला काहीच आक्षेप नसावा.पण,त्यानानातर जे 'प्रकार ' होतात,त्यात अपरिमित नुकसान मुलींचेच होते ना?ते आणि त्यास कारण ठरणाऱ्या गोष्टी मुलींनी नक्कीच टाळाव्यात. मुंबईतील स्त्री रोग तज्ञाकडे नोव्हे-डिसे.महिन्यात तरुणींची वाढती संख्या समाजहितैषी लोकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. अधिक काय बोलावे ?