Tuesday, 11 October 2011

बालपण सुखाचे.!


बालपण सुखाचेच असते.मात्र ते अधिक सुरम्य होते असे मोठे झाल्यावरच वाटते. जी गोष्ट हातातून निसटून जाते ती अधिक मोलाची भासते.आजचे तारुण्यही मोलाचेच आहे .ते असो. स्मरणरंजनाचा आनंद अवर्ननीयच असतो. माझा काळ वेगळा. त्यात गोळ्या=चोकोलेत्स ला मुळीच जागा नाही. पण,नवल म्हणजे माझ्या मुलांनाही बालपण म्हटल्यावर दुसरेच घरगुती पदार्थ आठवत असतील.आमच्या लहानपणी दशहरा-संक्रांतीला सोने द्यायला आणि तिळगुळ घ्यायला आम्ही... शेजारी,गुरुजन,आणि मैत्रिणींकडे जात असू. तेथे खाऊ म्हणून क्वचित गोळी मिळे.एक नव्या पैशात एक वा अधिक येत असाव्या.साखरेच्या पाकाच्या त्या गोळ्यांवर ४-६ रंगाच्या वक्र रेषा असतं.अगदी चांगल आठवते ते म्हणजे शहरी पाहुण्यांनी आणलेली १०-१२ च रावल्गावची कडक (,तेच त्याचे वैशिष्ठ्य असावे ) टोफी=चोकोलेत्स.ती ,आम्ही ४ सख्खी आणि २-३ चुलत भावंडे +कधी शेजारची मुले ह्यात वाटून घ्यायची. उरली तर ती लहान भावंडे पुरवून पुरवून खात आणि कधी आम्हा मोठ्यांना "टूक टूक माकड "..... म्हणून चिडवून खात. असे खाण्यात त्यांना शतपट आनंद ..! खरेच बालपणीचा काळ सुखाचा,वाटे मज तो आज परतावा साचा |--इति ज जो. ..!!