Tuesday, 11 October 2011

तुझी पत्रे हल्ली येतच नाहीत,छान लिहितेस .बरे वाटते ग." ...

तुझी पत्रे हल्ली येतच नाहीत,छान लिहितेस .बरे वाटते ग." ...
  
.
आज अचानक,एक प्रश्न पडला की ,किती दिवस झाले कोणाचे घरगुती पत्र च आले नाही. मग,मीच मला प्रतिप्रश्न केला की -"तू तरी लिहिलेस का कोणाला? " आणि मीच माझ्याशी खजील होऊन कबुली देऊन टाकली कि -... " नाही.पण,ते जरा चुकलेच माझे.....आता लिहीन . " . *ते पत्र लेखनाचे सुख आणि आलेले पत्र वा...चण्याचा अवर्णनीय आनंद ! तो पोस्त -मनची आतुरतेने वाट पाहण्याचा अनोखा अनुभव.पत्र येताच अत्यानंदाने वाचण्याची कोण घाई.....! सुहृदांचे पत्र एकदा वाचून समाधानच व्हायचे नाही .माहेरचे कुशल सांगणारे, विचारणारे पत्र म्हणजे... स्त्रियांना काही मोठे भांडार गवसल्याचा हर्ष. मग ,पुन:प्रत्ययाचा निवांत आनंद घेत ते पत्र सावकाश पुन:पुन्हा वाचण्याचे औरच समाधान.आज हे विचार मनात येत असतांना ,आता ठरवते आहे कि,मागच्या पिढीतील सारे सासर -माहेरचे अतिवृद्ध माझे नातलग उरलेत तरी कितीसे....त्या साऱ्यांना ( काही दिवस रोज एक एक लिहिले तरी प्रत्येकाला लिहायला एक पक्ष पुरेल.) " तुझी पत्रे हल्ली येतच नाहीत,छान लिहितेस .बरे वाटते ग "असे त्यांनी प्रेमाने म्हणावे आणि हसण्यावारी नेवून ,दुर् -ध्वनीची सोपी वाटच धरावी असेच हल्ली घडते. आज मात्र एक तरी पत्र लिहीनच म्हणते. आधी लिहीन शय्येवरच्या जावूबाईंना . ....आभार , असा प्रश्न समूहावर उपस्थित केल्या बद्दल,सज्जन गृहस्था ! मी आता डोळे पुसते आहे. पण,ते आज तुम्ही उघडलेत.