मिळाले त्यात सुख मानून कृतार्थ जीवन जगणारे फारच कमी लोक जगात दिसतील.--साधी गोष्ट-....भाजी विकत घेतांना हातातली जुडी किंवा भोपल्यापेक्षा दुसऱ्याच्या हातातला बरा वाटतो. आपल्या साडीपेक्षा दुसरीची छान आहे का ही शंका कुणा कुणाला छळते.छोट्या मुलांना मित्राची व जाहिरातीतली आई आवडते. आणि...जाऊ देत . इतकेच दाखले पुरेसे......पण मला मात्र माझा देश फार फार आवडतो.,माझे अमाप कष्टाने वर आलेले सूस्वभावी आई -वडील ...,कुटुंब ,माझ्यावरील केलेले संस्कार,माझे सामान्य -साधेसेच रूप(ज्यावर मी कधीही,कोणतेही वृथा प्रयोग करत नाही ),आमची पती-पत्नीची पूर्वीची निम्न् वर्गीय आर्थिक स्थिती आणि आमचे अपार कष्टाचे स्वाभिमानी जीवन ....हे सारे जे जसे होते आणि आता आहे, ते मला फार आवडते.त्यामुळेच मी उतले नाही ,मातले नाही ..पण आज समाधानी आहे.शांत चित्ताने झोपू शकते....हे लाखमोलाचे धडधाकट शरीर,स्मरणशक्ती नी बुद्धिमत्ता..सोन्यासारखी मुले ..आणि नातू !अधिक काय हवे ? देवा तू किती कृपावंत होऊन हे सारे मला दिलेस. मी खरेच कृतज्ञ आहे . अगदी कृतार्थ आहे......असे.... ,नव्हे याहून ही आपण ही सारे सुखी -समाधानी
असावे ही आपण सर्वांना शुभ कामना !