अमृतवाणी संस्कृत भाषा-
अमृतवाणी संस्कृत भाषा-नैव क्लिष्टा न च कठिना |--किती सोपे,सुन्दर मधुर शब्द आहेत !चालीवर म्हणीन बघा,अपोआप तालात येईल.मन आनंदाने भरून जाईल.खरेच.हि माझी गोडशी,प्रेमळ आज्जी आहे ,अशी भावना मनात जागवा.नि म्हणून बघा प्रेमभावाने. आहे ना खरेच देव-वाणी?गोड,पवित्र प्रसादासारखी?अमृत म्हटल्यावर आणि वेगळे काही सांगायची गरज आहे कुठे?या एका ओळीचा अर्थ अंदाजे, सगळ्यांना लक्षात आलाच असेल.अचूक कोणी सांगेल?मी तुमचे काम सोपे करते. ................................. - (१)-नैव = न+एव | (२)-क्लिष्ट=क्लिष्ट=किचकट (किचकट हा शब्द हि क्लिष्ट पासून आला असे वाटते ना?) क्लिष्ट : हे विशेषण पुल्लिंगी आहे जसे -क्लिष्ट: कार्य:| हेच विशेषण स्त्रीलिंगी = क्लिष्टा जसे- क्लिष्टा समस्या | ......- ( 3)- च = आणि .........झाले एवढेच !सहज येईल ना आता?