* "दसऱ्याला एवढी आपट्याची झाडे ओरबाडल्यासारखी तोडून ,त्याची पाने एकमेकांना वाटावीत असे शास्त्र खरेच पाळलेच पाहिजे का ?" ....
."जुनी कर्मकांडे आणि कालबाह्य रूढी-परंपरा आपण आता सोडून द्याव्यात. मी असल्या घाणेरड्या ,झाडे मारणाऱ्या गोष्टी करणार नाही,कोणाला करू देणार नाही. .." गेल्या दोन -चार दिवसात अशी वाक्ये आणि मत -मतांतरे कानावर पडत आहेत. यावर वादही झडत आहेत. ताबडतोबीने देण्यासारखे ठोस उत्तर माझ्याकडे नव्हते .पण,सामान्य ज्ञानाच्या भरवशावर मी उत्तर दिले कि ... .....
** आपट्याची पाने जुळी( -युग्म रुपात )असतात.तसे आपण सायुज्य= परस्परांशी जोडून राहावे हा त्यापाठी सुविचार.या दिवसात पानगळ होते. काही पाने तोडली तरी झाडाचे आपण म्हणतो तसे मरण ओढवत नाही. मात्र गरजेहून अधिक सारेच तोडू नये.तसे होतही नसावे. मर्यादित प्रमाणात छाटणी झाल्यास झाडाची वाढ झाल्याचे दिसते आणि खूप नवीन पालवी येतच असते.
सारे सण-परंपरा विचारपूर्वक योजिलेल्या आहेत.आपण बरेचदा ते समजावून घेत नाही.
आंबा,झेंडू ,कडूनिंब हि पाने फुले तोरणास का घ्यावी ?तर अतिशय योग्य रीतीने ...ती सावलीत वाळतात. नीट
साठवली जाऊ शकतात.ती जाळली कि डास नष्ट होतात. पाडव्यास निंब डहाळा दारास लावतात. ऋतू बदल काळ असतो हा .यावेळी व्हायरसेस (म्हणजे विष अणू) अधिक असतात. त्याला आळा बसतो त्या पानांनी. हीच पाने यावेळीच आणलेल्या साठवणुकीच्या धान्यात टाकतात. ओली पाने धान्यात टाकल्यास बुरशी येईल.तर हे
शास्त्रशुद्ध वाळवणे.
विचारू नका.थोतांड मानू नका.लॉर्ड मेकालेला विसरा .विचारण्यापेक्षा स्वत: विचार करून बघा. पाश्चात्य शाळांत संस्कृत शिकवले जातेय. आपले ज्ञान असून त्याचे पेटंट परदेशी लोक घेत आहेत.
मुलानो,जागे व्हा.रघुनाथ माशेलकरांनी हळद,कडूनिम्ब,बासमती पेटंटचा लढा जिंकला. आता आपण पुढे होऊ या,नि आपल्या ह्या संचिताचे रक्षण करू या.