राम झाड पान लक्ष्मण हवा घातली....?
संस्कृत खूप कठीण आहे,समजत नाही असे बरेच जण बरेचदा म्हणतात. हा बघा ,आपल्या कानावर नेहमी पडणारा ,अखिल हिंदू वर्गास पाठ असणारा श्लोक.समजण्यास कित्ती सोप्पा आहे. यातील राम हि अक्षरे असलेला प्रत्येक शब्द घ्या .मराठी व्याकरणातील विभक्ती प्रत्यय... आठवतात का?नाही?बरे,हरकत नाही. हे बघा काही शब्द येथे आहेत .मी म्हणते हे अर्थपूर्ण वाक्य आहे.तर ते तुम्हाला मान्य होईल का ?बघा हं- राम झाड पान लक्ष्मण हवा घातली.... समजले नाही ना?समजले वाटले असेल तरी खात्रीपूर्वक छातीठोकपणे अचूक अर्थ सांगता येईल?बहुधा उत्तर" नाही "असेच येईल .का बरे ?अहो एहाही शब्दाला पुढे अप्र्क्षित असलेला विभक्ती प्रत्यय जोडलाच नाही मी वेडीने.आता जोडते.बघा हं.- रामा-ने झाडा-चे पाना-ने लक्ष्मणा-ला हवा घातली.येथे ने,चेहे ते प्रत्यय आहेत.यावाचून भाषा शून्य/अधुरी hoil .हो ना? हेच या श्लोकात अगदी व्याकरणातील शास्त्रशुद्ध क्रमाने दिले आहे.फक्त ते एकवचनी नामासाठी आहेत.पान सुरुवातीस एवढे पुरेसे आहे.
रामो राजमणिः सदा विजयते | रामं रमेशं भजे |
रामेणाभिहता निशाचरचमू | रामाय तस्मै नमः॥
रामान्नास्ति परायणं परतरं | रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे| भो राममामुद्धर ||