मायबोलीवर प्रेम ...!!
जे मराठी बोलतात,मायबोलीवर प्रेम हि करतात ,पण अशुद्ध किंवा चुकीचे ,किंवा खिचडी(मिश्र भाषेत)बोलतात यावर काही नेटाने करावे असे वाटते.
आपण मराठी,हिंदी आणि इंग्रजी शिकतो.या भाषा एकमेकीत मिसळून वापरतो.या साऱ्या भाषा भगिनी आहेत.मला सर्वच प्रिय आहेत. पण ,विचार करा-इंग्रजी लिहिता-बोलतांना हिंदी/मराठी शब्द आपण वापरू का? वापरतो का?नाही ना ? का नाही?
अशी खिचडी भाषा योग्य नाही हे आपण अंतर्मनात मान्य करतो,हे बरोबरच आहे.
पण माय -मावशीच्या बाबतीत अनास्था दाखवतो.मराठीत खुशाल इंग्रजी शब्द मिसळतो.
कोणा -कोणाला तर यात अभिमानहि वाटतो.पण,खरे सांगा मित्रांनो,हे बरे का?
म्हणून ,मला असे वाटते की ,-एखाद्या facebook समूहाच्या भित्तीवर सदर, असे पान चालवता येईल. अनवट+रोजचीच वाक्ये, चुकीचे-शब्द ह्याची सुधारित/शुद्ध रूपे ...दैनंदिन भाषेचा दर्जा.....इ. काही करता येईल ना?
मग,असा एक उपक्रम आपण येथेच सुरू करून नियमितपणे राबवला तर? असा एक संस्कृत साठी लोकाग्रहास्तव आपण चालवत आहोतच आपल्या परिवारात.रोजच्या वापरातील साधे ,सोपे ,अनवधानाने सहजच बोलले जाणारे शब्द आणि वाक्ये घेवू या? चालेल?ठीक तर मग.आजच शुभारंभ करू या.