शासकीय समितीने गरीबीवर एक अहवाल शासनाकडे सोपवला.आणि पंतप्रधान(ते पंत नाहीत नि प्रधान नामधारीच ) सिंग यांनी तो स्वीकारला देखील !इंदिराजींनी गरीबी हटावचा घोष केला.हटली नाही. तेव्हा आता -" गरिबोको हटाव -गरिबी छुपाव|"असा कार्यक्रम हाती घेतलेला दिसतोय. २६ रुपयात काय २६००० रुपयात ज्यांचा दिवस भागत नाही (आठवा--शशी थरूर इत्यादीची घर मिळाले नाही मंत्री होताच म्हणून हॉटेलची बिले करदात्यांच्या बोकांडी) असे ल...ोक २६ रुपयात लोक मजेत राहतात असा निष्कर्ष मानत आहेत.गेल्या जनगणनेत ज्याच्या घरात दुचाकी (=सायकलच, इथ ,दुचाकी म्हणजे स्कुटर नव्हे )आणि पंखा आहे ते गरीबच नव्हेत असा निकष होता म्हणे .आता बोला !म्हणजे-पदयात्रेचा सक्तीचा कार्यक्रम जनतेनेच राबवावा . आणि रक्तदानाची सवयही अंगी बाणवावी. पंखा ( फ्यान )लावून डासांना उपाशी मारणे अहिंसेत बसत नसावे.सामान्य नागरिकांनी डासांना रक्तदान करून पुढे सतत होणाऱ्या रक्तपाताची सवय व्हावी असा उदात्त हेतू असावा . पुढे स्फोट,हाणामाऱ्या नि पोलिसांचे असहकारी धोरण,शासन मान्य गोळीबार( उ. प्र. आणि मावळचा गोळीबार ),गुंड नेमबाजांचे लक्ष्यभेदी खेळ( जे.डे. हत्या आठवतच असेल ना) , अतिरेकी हल्ले ,वारंवार होणारे अपघात,शेतकऱ्यांचे -,पिडीत स्त्रियांचे-,वृद्ध नागरिकांचे भीषण मृत्यू,( हत्या वा आत्महत्या) अशा घटना तर घडतच राहणार आहेत. लोकसंख्येला आला बसेल यातच कोणी आनंद मनात असावे कदाचित ....मेंदू काम करेनासा होतो की काय असा ' मनमोहक' कार्यक्रम सरकार राबवत आहे का? आजचे हे नेते म्हणजे ,- ना हे जनतेचे सेवक, ना रक्षक.म्हणावे का यांना भक्षक ?बिचाऱ्या प्रामाणिक करदात्याच्या कष्टाच्या पैशांवर फुकट पोसलेले हे मस्तवाल .... रोज तीळतीळ मरणाऱ्या नागरिकांच्या टाळूवरचे लोणी खावून अधिक गब्बर होताहेत म्हणावे का? सामान्य नागरिकाच्या सहनशक्तीलाही मर्यादा आहेत,तरुण चवताळून उठत आहेत.सामाजिक गटांवर या मुलांना आवरणे जिकीरीचे होत आहे.तुटेपर्यंत ताणू नये हे या उद्धवाच्या सरकारला कोणी सांगावे ?